जळगाव,
दिनांक ७ : एकात्मिक बाल विकास प्रकल्प जळगाव (नागरी)
कार्यालयाच्यावतीने योजना नागरी क्षेत्रात माहे सप्टेंबर २०१८ हा संपूर्ण महिना
पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे.
“सही पोषण, देश रोषण, प्रत्येक घर पोषण उत्सव” हे ब्रीदवाक्य घेऊन पोषण अभियानाचे जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात
आली आहे. पहिल्या आठवड्यात १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत प्रभात फेरी, ० ते ६ वर्ष
वयोगटातील बालकांचे वजन घेणे व छाननी करणे, अंगणवाडी स्तरावर बिट विभागात पालकांच्या
बैठका घेऊन पोषण, स्वच्छता, आरोग्य जनजागृती उपक्रमासह बेटा-बेटी याबाबत सांख्यिकी
दर्शविणारे फलक लावणे व पोषण बाबत जनजागृती अभियानासह गरोदर मातेचे ओटी भरणे,
मुलीला जन्म देणाऱ्या माता पितांचा सत्कार करणे. या सह विविध उपक्रम राबविण्यात
येत आहे.
दुसऱ्या आठवड्यात
दिनांक १० ते १६ सप्टेंबर या कालावधीत विभागात आरोग्य / स्वछता / पोषण असे विविध
उपक्रमांसह महिलांसाठी योगाची माहिती. वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर यांचे
सहाय्याने महिला व किशोरी यांच्यात आरोग्याची आणि स्वछतेची जनजागृती, स्तनदा गरोदर
माता यांच्यात आरोग्याच्या चांगल्या सवयीबाबत लोक जागृती होण्याकरिता एकत्रित गृह
भेटी देण्यात येऊन आरोग्य, पोषण, स्वच्छता, बेटी बचाव बेटी पढाव अन्य मार्गदर्शन,
जनजागृती करण्यात येत आहे. स्वच्छतागृह पिण्याच्या पाणी या बाबत मार्गदर्शन विविध
उपक्रम राबविण्यात येणार आहे.
दिनांक १७ तारखेपासून
सप्टेंबर अखेरपर्यंत विभागात पोषण मेळावे, विविध पाककृती स्पर्धा, विविध फळांचे पोशाकासह,
बालकांची फेन्सी ड्रेस स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा जनजागृती करिता पठनाट्य,
लोकगीत, भारुड, निबंध स्पर्धाचे, आयोजन करणे. यामध्ये स्थानिक लोक प्रतिनिधींचा
सहभाग घेऊन रक्तक्षय मुक्त भारत, बेटी बचाव बेटी पढाव, मुलगा-मुलगी समान, बाल
विवाह या विषयावर जनजागृती, महिलांकरिता विविध कल्याणकारी योजना मार्गदर्शन,
किशोरींकरीता विकासात्मक कार्यक्रम शिबिराचे आयोजन करणे व अन्य उपक्रम राबविण्यात
येणार आहे.
हा उपक्रम राबविण्याकरिता
या महिन्यात येणारे उत्सव दहीहंडी, बैलपोळा, गणेश उत्सव इत्यादी सार्वजनिक उत्सावांचे
ओैचित्य साधून पोषण महिन्यामधील विषयांची अधिक व्यापक प्रसिद्धी जनमाणसात करण्याकरीता
कार्यालयाच्या मुख्यसेविका व सेविका-मदतनीस यांना श्रीमती सरस्वती बागुल, बाल विकास
प्रकल्प अधिकारी हया विस्तृत मार्गदर्शन करीत आहे. हा माह यशस्वी करण्यासाठी मुख्यसेविका
श्रीमती दुबलगुंडे, सोनावणे, पाटील, तडवी, रत्ना चौधरी, जिजा चौधरी व प्रकल्पाच्या
कार्यरत अंगणवाडी सेविका-मदतनीस संयुक्तपणे मोठ्या उत्साहाने बाल विकास प्रकल्प
अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने विविध उपक्रम राबवित आहे.
000
No comments:
Post a Comment