जळगाव, दि. 6 - आगामी सण व उत्सवांच्या
काळात अन्न पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत:
परराज्यातून येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी जिल्ह्याच्या
सीमाभागात अन्न व औषध विभागाने खास पथके नेमूण जिल्ह्यात धडक तपासणी मोहिम
राबवावी. अशा सुचना अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आज दिल्यात.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक
आज अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. यावेळी त्यांनी याबाबत सूचना दिल्यात.
या
बैठकीमध्ये अशासकीय सदस्यांनी महामार्गावर अपघात झाल्यास त्वरीत प्राथमिक उपचार
होण्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणेसाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. शेतमालाचे
मोजमाप करताना शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात फसवणूक होत असल्याने मोजणी करण्यासाठी
इलेक्ट्रॉनिक्स काटा वापरण्यात यावा. मेहरुण तलावाजवळील गैरप्रकार रोखण्यासाठी सांयकाळच्या
वेळी निर्भया पथकाने याठिकाणी गस्त घालावी. बोदवड शहरातील साफसफाई करणे, जिल्ह्यात
अनेक गर्दीच्या ठिकाणी काळी, पिवळी
टॅक्सीवाल्यांनी अनाधिकृत थांबे सुरु केले आहे. ते अनाधिकृत थांबे बंद करावेत.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यीनींची रोडरोमिओकडून होणारी छळवणूक रोखण्यासाठी
उपायायोजना करणे, वाहतुकीची शिस्त पाळणे यासह अनेक सुचना सदस्यांनी उपस्थित केल्यात.
बैठकीच्या सुरुवातीस सदसय् सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी मागील
बैठकीत सदस्यांनी उपस्थित केलेल्या सुचनांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती
दिली.
या बैठकीस शासकीय सदस्य उप प्रादेशिक परिवहन
अधिकारी जयंत पाटील, पोलीस उपअधिक्षक संजय सांगळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास
बोडके, सहाय्यक नियंत्रक वैधमापन शास्त्र श्री. राजेंद्र बांगर, सदस्य सचिव तथा
जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, अन्न व औषध विभाग, आरोग्य विभाग व दूरसंचार
विभागाचे प्रतिनिधी, ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य रविंद्र पाटील, राहूल
बोरसे, डॉ.अर्चना विशाल पाटील, सौ. पल्लवी पुरूजित चौधरी, ॲङ मंजुळा कचरूलाल
मुंदडा, साहित्यिक अ. फ. भालेराव, बाळकृष्ण गंगाधर वाणी, शिवाजीराव अहिरराव, सतिश
गडे, सौ. उज्वला देशपांडे, अण्णा धुमाळ, सौ.
कल्पना पाटील, विकास कोटेचा, नरेंद्र बाळू पाटील आदि उपस्थित होते .
000
No comments:
Post a Comment