Saturday, 1 September 2018

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा सुधारीत


     जळगाव, दि. 1 :- राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील हे रविवार दि. 2 सप्टेंबर, 2018 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
            रविवार दि. 2 सप्टेंबर, 2018 सकाळी 9.00 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने मुक्ताईनगरकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. मुक्ताईनगर येथे आगमन  व आ. एकनाथराव खडसे यांच्या फार्महाऊसवर राखीव. सकाळी 11.10 वा. शासकीय तंत्र निकेतन (अल्पसंख्यांक) इमारतीचे भुमीपुजन समारंभास उपस्थिती. (स्थळ:- मुक्ताईनगर, जि.जळगाव), सकाळी 11.40 वा. आ. एकनाथराव खडसे यांच्या अभिष्टाचिंतन सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ :- संत मुक्ताई मंदिर कोथळी, मुक्ताईनगर, जि.जळगाव), दुपारी 1.00 वा. संत मुक्ताई मंदिर, कोथळी येथून वाहनाने आ. एकनाथराव खडसे यांच्या फार्महाऊसकडे प्रयाण. दुपारी 1.10 वा आ. एकनाथराव खडसे यांच्या फार्महाऊस, मुक्ताईनगर येथे आगमन व राखीव. दुपारी 1.45 वा. मुक्ताईनगर येथून वाहनाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 3.15 वा. आगमन व रेशन दुकानदार संघटनेच्या मेळाव्यास उपस्थिती. (स्थळ :- जळगाव पत्रकार भवन, जळगाव), दुपारी 3.45 वा. शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4.00 वा. शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांसमवेत शासकीय कामकाजाबाबत चर्चा. (स्थळ:- शासकीय विश्रामगृह, जळगाव), सायं. 7.00 वा. दैनिक तरुण भारत आयोजित तरुण उद्योजकांशी थेट संवाद कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ :- हॉटेल प्रेसिडेंट, एमआयडीसी, जळगाव), रात्री 9.15 वा. वाहनाने जळगाव रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 9.30 वा. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. रात्री 9.53 वा. जळगाव येथून आझाद हिंद एक्सप्रेसने पुणेकडे रवाना.
000000

No comments:

Post a Comment