जळगाव, दि. 10 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर
संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी एमएच 19/डीजी-0001 ते 9999 पर्यंतची
मालिका दि. 18 सप्टेंबर, 2018 पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी दि. 14 व 15
सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज करावा. त्यासोबत शासकीय शुल्काचा उप प्रादेशिक
परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे असलेला धनादेश, ओळखपत्र जमा करावे. त्यानंतर
आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क
भरल्यानंतर वाहनाचे कागदपत्र तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील.
सदरची मालिका चालू असतांना वाहन- 4
प्रणाली कार्यान्वयीत झाल्यानंतर बंद करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी. नविन
मालिका दि. 18 सप्टेंबर, 2018 पासून सुरु करण्यात येईल. प्राप्त होणारे अर्ज
दुपारी 4 वाजेपर्यंत स्विकारले जातील. 15 सप्टेंबर, 2018 रोजी अर्जाची छाणनी
करण्यात येईल. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास पुढील पध्दतीने
क्रमांक जारी करण्यात येतील. दि. 15 सप्टेंबर, 2018 रोजी दुपारी 4 वा कार्यालयात
एकापेक्षा जास्त अर्ज आले किंवा कसे याबाबत संबधितांनी चौकशी करावी. एकापेक्षा
जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्याबाबतीत 17 सप्टेंबर, 2018 रोजी संध्याकाळी 4
वाजेपर्यत वाढीव शुल्काच्या धनाकर्ष डीडी स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे
बंधनकारक राहील. 17 सप्टेंबर, 2018 सायंकाळी साडेचार वा बंद लिफाफे उघडण्यात येतील
व जास्त रक्कमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व
उर्वरीत धनादेश परत करण्यात येतील. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील
यांनी कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment