जळगाव, दि. 10 - महिला व बाल विकास विभागातंर्गत एकात्मिक बाल विकास
प्रकल्प, जळगाव नागरी कार्यालयाच्यावतीने माहे सप्टेंबर 2018 हा संपूर्ण महिना
पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी
सरस्वती बागूल यांनी दिली आहे.
या उपक्रमातंर्गत ज्ञानसाधना विद्यालय,
पिंप्राळा, हुडको येथे मंगळवार दिनांक 11 सप्टेंबर, 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता
विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नगरसेवक सुरेश सोनवणे,
नगरसेवक कुलभुषण पाटील, नगरसेविका प्रतिभा
कापसे, नगरसेवक मयुर कापसे,
नगरसेविका शोभा बारी, नगरसेविका हसिनाबी शेख,
नगरसेवक राम राठोड, उच्च शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ. हेमलता नेवे, सामाजिक
कार्यकर्ते श्री. अडकमोल मुख्याध्यापिका छाया भोळे आदि मान्यवर उपस्थित राहणार
आहेत.
जिल्ह्यात पोषण महिना अभियान कार्यक्रमातंर्गत
विविध कार्यक्रम घेऊन जनमाणसात जनजागृती करण्यात येत आहे. प्रकल्पाच्या
कार्यक्षेत्रात विभागातील गरोदर माता यांचे ओटी भरण करणे, बेटी बचाव, बेटी पढाओ
जनजागृती, स्तनदा माता, गरोदार माता व विभागातील महिला, पालक वर्ग, किशोर मुले-
मुली, तसेच अंगणवाडीतील लाभार्थी यांना आरोग्य, स्वच्छता, पोषण, विकासात्मक
योजनेची माहिती, शिक्षणाचे महत्व वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक विकास, अन्य
विकासात्मक बाबींचे मार्गदर्शन करण्यात येऊन त्यांच्यात जनजागृती करण्यात येत आहे.
6 महिने ते 5 वर्ष वयोगटातील बालकांचे आरोग्याची निगा, मुलींचे शिक्षण, पोषण आहार
व विवाहाचे योग्य वय, आरोग्यदायी व सुक्ष्म पोषण मूल्य असलेल्या आहाराचे सेवन अन्य
विविध प्रबोधनात्मक कार्यक्र व उपक्रम आयोजित करुन पोषणाबाबत जनजागृती करण्यात येत
आहे.
या कार्यक्रमास परिसरातील महिला वर्ग,
पालक वर्ग व किशोरी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन बालविकास
प्रकल्प अधिकारी सरस्वती बागुल यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment