Saturday, 7 October 2017

छपाई तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोहचविण्याचे परिषदेचे कार्य गौरवास्पद -जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर



        जळगाव,दि.7 :- छपाई तंत्रज्ञानात अनेक बदल झाले अधुनिक छपाई तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोहचविण्याचे परिषदेचे कार्य गौरवास्पद असल्याचे उदगार जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी येथे काढले. केसीई सेसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे 59 वे अधिवेशन व महाप्रिंट प्रदर्शनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर आयोजित समारंभात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब आंबेकर हे होते. यावेळी मंचावर इ.मा.पा.चे अध्यक्ष श्री.दयाकर रेड्डी, मु.जे. महाविदयालयाचे प्राचार्य उदय कुलकर्णी, केसीई सोसायटीचे सहसचिव श्री. किरण बेंडाळे उपस्थित होते.  श्री. निंबाळकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, छपाई उद्योगात खूपच प्रगती झाली शिळा छपाई यंत्रापासून तर आजच्या डिजीटल रंगीत वेगवान छपाई, छापखाना पूर्वी जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणीच असायचा खिळे जुळवून मजकूर तयार केला जात असे आज ऑफसेट छपाई यंत्रे गाव पातळीपर्यत पोहचले आहेत. यावेळी श्यामची आईया पुस्तकाची पुण्यात होत आलेली  छपाई प्रत्यक्ष पहाण्याची संधी मिळाल्याच्या आठवणीलाही त्यांनी उजाळा दिला.
            कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मुद्रा मासिकाच्या विशेषाकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. साधना थत्ते तसेच परिषदेच्यावतीने म.मु.प. चे उपाध्यक्ष श्री. बाळकृष्ण वाणी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. भाग्यश्री भलवतकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. कमलेश धारगळकर यांनी केले.
०००००

No comments:

Post a Comment