जळगाव दि. 31 :- राष्ट्रीय एकता
दिनानिमित्ताने पोलीस विभागाचे पथ संचलन आज सायंकाळी संपन्न झाले. जिल्हाधिकारी
कार्यालयातील आवारातून या पथ संचलानास सुरुवात झाली. आकाशवाणी चौक मार्गे काव्य
रत्नावली चौकात या पथ संचलनाचा समारोप करण्यात आला. या पथ संचलनात जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपविभागीय पोलीस अधिकारी
(मुख्यालय) रशीद तडवी आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने
सहभागी झाले होते.
या
पथ संचलनात गृहरक्षक दल, राष्ट्रीय कॅडेट कोअर, शीघ्र कृती दलाचे जवान सहभागी झाले
होते. आकर्षक पोषाख, शिस्तबद्ध संचलनाने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधुन घेतले
होते.
00000
No comments:
Post a Comment