जळगाव, दि.
27 :-
जामनेर तालुक्यातील कमानीतांडा अंतर्गत साठवण तलाव लोंढरी, शेरी, लघु पाटबंधारे
उपविभाग , जामनेर मंजुर उपसा लाभधारक, जामनेर साठवण तलाव, लघु तलाव शहापुर, वाकडी
, कांग, सुर, लघु पाटबंधारे उपविभाग , जामनेर मंजुर उपसा लाभधारक, पाचोरा साठवण
तलाव अटलगव्हाण , लघु पाटबंधारे उपविभाग ,पाचोरा मंजुर उपसा लाभधारक, चाळीसगाव लघु
तलाव बाणगाव, जामडी, मुंदखेडा लघु पाटबंधारे उपविभाग पाचोरा, मंजुर उपसा लाभधारक,
रावेर लघु तलाव गंगापुरी, मात्रणनाला,
चिंचाटी लोहारी, लघु पाटबंधारे उपविभाग , सावळ मंजुर उपसा लाभधारक, यावल लघु तलाव
वड्री, हरिपुरा, लघु पाटबंधारे उपविभाग, भुसावळ, मंजुर उपसा लाभधारक, मुक्ताईनगर
लघु तलाव जोंधलखेडा, लघु पाटबंधारे उपविभाग ,भुसावळ मंजुर उपसा लाभधारक
वरील प्रकल्पावर जेथे शक्य असेल तेथे कालव्याव्दारे (प्रवाही) तसेच
अधिसूचित लाभ क्षेत्रातील नदी, नाला व इतर जलाशयातुन उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग
घेणा-या सर्व बागायतदारांना कळविण्यात येते की, रब्बी हंगाम 2017-18 या वर्षामध्ये
उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगामात 28 फेबुवारी 2018 या मुदतीत गहु, हरभरा,
ज्वारी, कपाशी, भाजीपाला इतर तेलबिया कडधान्य व भूसार चाऱ्याचे पिके या सारख्या
पिकांसाठी पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरिक्त उपलब्ध पाणीसाठयातुन पाणी पुरवठा
करण्याचे ठरविण्यात आले आहे. पूर्ततेसह पाणी अर्ज नमूना नं. 7 अ वर मागणी करावी.
सदरचे पाणी अर्ज दि. 15 नोव्हेबर 2017 पर्यंत आपल्या भागातील संबंधित लघु
पाटबंधारे बांधकाम उपविभागात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष देण्याचे
करावे.
सिंचनाच्या
पाणी पुरविण्यासाठी खालील अटी व शर्ती राहतील :- रब्बी हंगाम सन 2016-17
अखेर संपूर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहील.
पाटमोट संबंध नसावा. प्रत्येक
चारीवर सलग क्षेत्रासच मंजुरी दिली जाईल. शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. पाणी अर्जाचा निर्णय उपविभाग, ग्रामपंचायत
कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल.
मंजूर क्षेत्रासच व मंजुर पिकांनाच पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देतांना
7/12 उतारा किंवा खाते पुस्तीका संबंधित उपविभागास दाखवावी लागेल. मंजूरी
पाटबंधारे अधिनियम (महाराष्ट्र राज्य) 1976 प्रचलीत शासनाने वेळोवेळी काढलेले आदेश
तसेच प्रचलीत नियमानुसार अनुसरुन राहील. असे उप कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे
विभाग जळगाव यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment