Monday, 23 October 2017

शेतकरी परदेश अभ्यास दौऱ्यासाठी 25 ऑक्टोबर रोजी सोडत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन



       जळगाव, दि.23 - राज्यातील शेतक-यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्यावर नेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या अर्जाची सोडत पध्दतीने शेतक-यांची ज्येष्ठता क्रमवारी निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी 25 ऑक्टोबर, 2017 रोजी दुपारी 3 वाजता कृषी चिकित्सालय, ममुराबाद रोड, जळगाव येथे सोडत काढण्यात येणार आहे.
            जिल्हयातील ज्या शेतक-यांनी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज सादर केले असतील त्यांनी 25 ऑक्टोबर, 2017 रोजी दुपारी 3 वाजता कृषि चिकित्सालय, ममुराबाद रोड, जळगाव येथे उपस्थित रहावे. असे आवाहन विवेक सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वे केले आहे.
000

No comments:

Post a Comment