Friday, 13 October 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



            जळगाव, दि. 13:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शनिवार दि 14 व रविवार 15 ऑक्टोबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            शनिवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 ते सायं. 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं. 7 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
            रविवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वा. 30 मि.नी. पर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव व खेडी ता. जळगावकडे प्रयाण. सकाळी 9 वा. खेडी ता. जळगाव येथे नवीन ग्राम पंचायत कार्यालय इमारत उद्घाटन सोहळा व विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वा. जळके ता. जळगावकडे प्रयाण. सकाळी 10 वा. 30 मि.नी. जळके, ता. जळगाव येथे श्री. रमेश आप्पा पाटील यांच्या जीवन प्रवास या पुस्तीकेचा प्रकाशन व सेवापुर्ती कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वा. 30 मि.नी. जळगावकडे प्रयाण. दुपारी 12 वा. जळगाव येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती. (स्थळ :- कै. गंधे सभागृह, ला. ना. हायस्कुल जळगाव), दुपारी 1 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. सायं. 5 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. रात्री 8 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. रात्री 10 वा. 30 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11 वा. 15 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशनहून अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
                                                                        000000

No comments:

Post a Comment