जळगाव, दि.6:-
जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून 9 ते 14
ऑक्टोबर या कालावधीत जळगाव डाक विभागातर्फे “
राष्ट्रीय डाक सप्ताह” आयोजित करण्याचे योजिले आहे. जागतिक टपाल
दिनाचा हेतू सामान्य जनतेच्या आणि व्यावसायिकांच्या जीवनात पोस्टल सेक्टरची भूमिका
आणि देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासासंदर्भातील योगदानाबद्दल जागरुकता निर्माण
करणे हा आहे. या डाक सप्ताहाचे उद्दिष्ट जनता आणि माध्यमांमध्ये डाक विभागाच्या भूमिकेबद्दल
व्यापक जागरुकता निर्माण करणे हे आहे. राष्ट्रीय डाक सप्ताहाचा भाग म्हणून डाक
विभाग खालील प्रमाणे दिवस साजरे करणार आहे.
9
ऑक्टोबर जागतिक टपाल दिवस, 10 ऑक्टोबर -
बँकिंग दिवस, 11 ऑक्टोबर - डाक जीवन विमा दिवस, 12 ऑक्टोबर - फिलाटेली दिवस, 13
ऑक्टोबर - व्यवसाय विकास दिवस, 14 ऑक्टोबर - मेल दिवस या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात
आलेले असून त्याव्दारे डाक विभागाची जास्तीत जास्त प्रसिध्दी करण्याचा विभागाचा
मानस आहे. व्यवसाय विकास दिवस साजरा करताना डाक विभागास सर्वाधिक उत्पन्न देणा-या
ग्राहकांचा सन्मान करण्यात येणार असून नवीन ग्राहक डाक विभागाकडे वळविण्याबाबत काय
उपाययोजना करण्यात येतील. याबद्दल चर्चा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बदलत्या
काळाप्रमाणे डाक विभागामध्ये काय काय बदल झाले व ग्राहकांच्या दृष्टीने कुठले बदल
प्रस्तावित आहेत. याबद्दल देखील ग्राहकांना अवगत केले जाणार आहे.असे अधीक्षक डाकघर
जळगाव डाक विभाग जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment