Friday, 6 October 2017

जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते आमदार डॉ. पाटील यांचे उपोषण समाप्त



          जळगाव, दि.6:- राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री ना. श्री. गिरीष महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर  आज राष्ट्रवादीचे आमदार माजी राज्यमंत्री डॉ. सतीष पाटील यांची उपोषण स्थळी भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. ना. महाजन यांनी फळाचा रस देवून डॉ. सतीष पाटील यांच्या उपोषणाची सांगता केली यावेळी त्यांच्यासमवेत जळगाव शहराचे आमदार श्री. सुरेश भोळे, तापी पाटबंधारे महामंडळाचे सल्लागार व्ही. डी. पाटील आदि अधिकारी उपस्थित होते.
        पारोळा, एरंडोल तालुक्यातील पाणी टंचाईची परिस्थितीकडे शासनाचे लक्षवेधून गिरणा धरणातून अंजनी व बोरी नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून आमदार डॉ. सतीश पाटील उपोषण करीत होते. ना. महाजन यांनी आज त्यांची भेट घेवून टंचाई परिस्थितीबाबत त्यांच्या भावना जाणून घेतल्या 15 ऑक्टोबरनंतर टंचाई बाबत आढावा घेवून जिल्हाधिकारी त्या त्या जिल्हयात दुष्काळ जाहिर करतात असे शासन निर्णय असल्याने त्यापूर्वी आपण कोणताही निर्णय घेवू शकत नाही. 15 ऑक्टोबरनंतर असलेल्या परिस्थितीचा विचार करुन तत्काळ निर्णय घेतला जाईल. यासाठी जिल्हाधिकारी टंचाई बाबत आढावा बैठक घेवून तसेच कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती ना. महाजन यांनी उपोषणकर्त्याना दिली. उपोषणकर्त्यानी ना. महाजन यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत फळांचा रस सेवन करुन आपल्या उपोषणाची सांगता केली. यावेळी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, ॲड. रविंद्रभैय्या पाटील आदि उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment