जळगाव दि: 3 - लोकशाही दिनी प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांवर
संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करुन तक्रारदारास न्याय
देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिल्या.
या महिन्याचा लोकशाही दिन येथील जिल्हा
नियोजन भवनात संपन्न झाला. या लोकशाही
दिनास अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मस्कर, अपर जिल्हाधिकारी तथा निवासी
उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, अधीक्षक कृषी अधिकारी श्री. विवेक सोनवणे, जिल्हा
नियोजन अधिकारी दिनेश वाघ, पोलिस उपअधिक्षक आर.आर. तडवी आदि अधिकारी उपस्थित होते.
आजच्या लोकशाही दिनात एकूण 101 अर्ज प्राप्त झाले आहेत.
०००००
No comments:
Post a Comment