जळगाव,
दि. 23 - महाराष्ट्र विधानमंडळाची पंचायती राज समिती 25 ऑक्टोबर पासून तीन
दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या समितीचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
बुधवार
दिनांक 25 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी दहा ते साडेदहा वाजेपर्यंत जळगाव जिल्ह्यातील
विधानमंडळाच्या सदस्यांशी अनौपचारिक चर्चा. स्थळ- शासकीय विश्रामगृह, जळगाव. सकाळी
साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत जळगाव जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी अनौपचारिक
चर्चा. स्थळ- शासकीय विश्रामगृह, जळगाव. सकाळी अकरा वाजता सन 2008-2009 आणि
2011-2012 च्या लेखा परिक्षा पुनर्विलोकन अहवालातील जळगाव जिल्हा परिषदेच्या
संबंधातील परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची
साक्ष. स्थळ - जिल्हा परिषद सभागृह, जळगाव तसेच गुरुवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी
भेट देण्यात यावयाच्या पंचायत समित्या ठरविणे.
गुरुवार
दिनांक 26 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी नऊ वाजेपासून जिल्ह्यातील पंचायत समित्या, प्राथमिक
आरोग्य केंद्रे, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, व ग्रामपंचायतींना भेटी, पंचायत
समित्यांचे गट विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची प्रश्नावली क्रमांक दोन च्या
संदर्भात साक्ष.
शुक्रवार
दिनांक 27 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी दहा वाजेपासून जिल्हा परिषदेच्या सन 2012-2013 या
वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष.
जिल्हा परिषद सभागृह, जळगाव.
000
No comments:
Post a Comment