जळगाव, दि.4:- जळगाव जिल्हयातील सर्व गोदाम चालक व मालक यांनी आपले परवाने
नूतनीकरण करावे असे आवाहन उपनिबंधक विशाल जाधवर यांनी केले आहे. मुंबई वखार कायदा
1959 मधील कलम 4 नुसार प्रत्येक गोदाम व्यवसायिकास वखार परवाना घेणे व कलम 6 नुसार
सदरचा गोदाम परवाना नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. हे परवाना जिल्हा उपनिबंधक सहकारी
संस्था, जळगाव, नवीन प्रशासकीय इमारत, 1 ला मजला, टप्पा क्रमांक 3, आकाशवाणी चौक,
जळगाव यांचे कार्यालयाकडून प्राप्त करणे आवश्यक आहे. जिल्हयात अनेक गोदाम हे
विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे तसेच कलम 5 नुसार आवश्यक त्या सोयी, सुविधा पुरवित
नसल्याचे देखील निदर्शनास आलेले आहे. अशा गोदाम व्यवसायिकांनी आपले परवाने
नूतनीकरणासाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांचे कार्यालयात संपर्क साधून
सरकारी चलनाचा भरणा करुन आपल्या गोदामास परवाना प्राप्त करुन घ्यावा व कलम 5
नुसारआवश्यक त्या सोयी सुविधा गोदामाच्या ठिकाणी उपलब्ध करुन द्याव्यात. तसे न
केल्यास आपणाविरुध्द मुंबई वखार कायदा 1959 व त्याखालील नियम 1960 नुसार पुढील
कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असे जिल्हा
उपनिबंधक सहकारी संस्था श्री. विशाल जाधवर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविलेले आहे. ०००००
No comments:
Post a Comment