Wednesday, 25 October 2017

भारतीय वायूसेनेसाठी 7 नोव्हेंबर रोजी जळगाव येथे भरती मेळाव्याचे आयोजन



       जळगाव, दि. २५ - भारतीय वायूसेनेतील एअरमॅन ग्रुप वाय नॉनटेक्नीकल ट्रेडस, (ऑटोमोबाईल टेक्निशियन, जी.टी.आय व आयएएफ (पी) या पदासाठी ७ नोव्हेंबर, २०१७ सकाळी ६ वाजता मूलजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथे भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी दिली आहे.
            या पदासाठी पात्रता दहावी+२ ही परीक्षा ५० टक्के गुणांसह पास असणे आवश्यक आहे. (इंग्रजीमध्ये ५० गुण आवश्यक), वयोमर्यादा- उमेदवार हा १३ जानेवारी, १९९८ ते २७ जून २००१ दरम्यान जन्मलेला असावा, उंची - ऑटोमोबाईल टेक्निशियन या पदासाठी १६५ सेमी, ग्राऊंड ट्रेनींग इन्स्ट्रक्टर (जी.टी.आय) या पदासाठी १६७ से.मी व आयएएफ (पी) या पदासाठी १७५ सेमी असावी.
            या भरतीकरीता अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, गोंदीया, हिंगोली, जळगाव (भरतीचे ठिकाण), जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्हयातील उमेदवार भरतीस उपस्थित राहू शकतील.
            अधिक माहिती तसेच भरती संबधी काही बदल, नवीन माहिती असल्यास भारतीय वायुसेना भरती कार्यालयाची वेबसाईट www.airmenselection.gov.in  वर उपलब्ध आहे. उमेदवारांनी ही वेबसाईट वेळोवेळी बघावी. या भरतीस जळगाव जिल्ह्यातील अविवाहित व पात्र नवयुवकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment