जळगाव,दि.16- दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी
आयोजित करण्यात येणारा महिला लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी
श्री. किशोर राजे निंबाळकर यांचे प्रतिनिधी भुसंपादन उपजिल्हाधिकारी श्री. सुलामे
यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी 4 महिलांनी आपले तक्रारी अर्ज दाखल केले.
हे चारही अर्ज जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, या विभागाशी संबंधित आहेत. यावेळी
जिल्हाधिकारी, यांचे प्रतिनिधी, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे प्रतिनिधी,
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे प्रतिनिधी, सदस्य सचिव जिल्हा महिला व बाल विकास
अधिकारी यांचे प्रतिनिधी, संरक्षण अधिकारी श्रीमती ए.सी.साळूंखे आदि उपस्थित होते.
अध्यक्षांनी
लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्ज व निकाली अर्जाचा आढावा घेतला व संबधीत विभागांनी
महिला लोकशाही दिनातील तक्रार अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना दिल्या.
असे महिला व बालविकास अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment