Friday, 27 October 2017

सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा



जळगाव, दि. 27:- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे हे रविवार 29 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-
रविवार 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वा. 15 मि.नी. महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगावकडे प्रयाण. सकाळी 8 वा. 20 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन. सकाळी 9 वा. 30 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथून शासकीय वाहनाने मुक्ताईनगर जि. जळगावकडे प्रयाण. सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह मुक्ताईनगर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. 05 मि.नी. मुक्ताई सहकारी साखर कारखानाच्या चौथा गळीत हंगामाचा शुभारंभ व 12 मेगा वॅट सह वीज निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन (स्थळ :- घोडसगांव मुक्ताईनगर), दुपारी 2 वा. 30 मि.नी. मुक्ताईनगर येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 4 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वा. 30 मि.नी. सामाजिक न्याय विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक. (स्थळ :- अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव), सायं. 5 वा. मदत व पुनवर्सन तसेच अल्प संख्याक विकास विभागाचा कामाचा आढावा बैठक. (स्थळ :- अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव),रात्री 10 वा. 55 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथून शासकीय वाहनाने जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री 11 वा. 15 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment