Tuesday, 3 October 2017

कृषी सह संचालक अशोक झेंडे याच्या हस्ते कृषी औजारे वितरण संपन्न



           



            जळगाव, दि. 3 :-   उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिम सन 2017 -18 राष्ट्रीय कृषि विकास योजना, कृषि यांत्रिकीकरण उपअभियान, फलोत्पादन यांत्रिकीकरण या योजनेतील ट्रॅक्टर व औजारे वितरण कार्यक्रम मा. श्री. झेंडे, विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग नाशिक यांच्या हस्ते करण्यात आला.
            किड व रोग सर्व्हेक्षण व सल्ला प्रकल्पातंर्गत मौजे- ममुराबाद ता. जि. जळगाव येथील शेतकरी श्री. अशोक उखर्डू पाटील गट क्र.276 यांचे कापूस पिक प्रक्षेत्रास भेट देऊन किड व रोग व त्याकरिता औषधी व किटकनाशक फवारणीबाबत मार्गदर्शन केले.  मौजे-करंज ता. जि. जळगाव येथील शेतकरी श्री. मोहनचंद नारायण सोनवणे यांनी तयार केलेले कमी खर्चावर आधारित केळी रायपनिंग चेंबरला भेट देऊन पाहणी केली व विक्री व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले. अहिल्याबाई होळकर विकास बचत गट, करंज येथील शेतकरी  श्री. देवकिनंदन विठ्ठल पाटील यांनी सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत तयार केलेले गांडूळ खत यूनिटची पाहणी, श्रीमती. सिंधुबाई मधुकर पाटील यांनी तयार केलेले गांडूळ खत यूनिट, तरल खत व सी.पी.पी. यूनिटची पाहणी करुन मार्गदर्शन केले.
            राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत श्री. राकेश पाटील यांनी उभारणी केलेले आळंबी उत्पादन प्रकल्पाची पाहणी करुन त्या ठिकाणी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले. सेद्रिय शेती योजनेअंतर्गत पीजीएस प्रणालीद्वारे प्राप्त सेद्रिय शेती प्रमाणिकरणाचे प्रमाणपत्र मा. विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग नाशिक यांच्या हस्ते शेतक-यांना वितरित करुन सदर प्रमाणपत्राच्या आधारे विक्री व्यवस्था करणे विषयी मार्गदर्शन केले.
०००००

No comments:

Post a Comment