जळगाव, दि.
9 – जळगाव डाक विभागातील निवडक पोस्ट ऑफिसमध्ये आधारकार्ड
अदयावत (update) करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या केंद्रावर आधार कार्डधारकाचे
नाव पत्ता, मोबाईल नंबर व ईमेल आयडी अदयावत करण्यात येतील. रु. 25/- ( रु. पंचवीस
मात्र) हे शुल्क पोस्ट ऑफीसमध्ये जमा करुन सदरील सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा.
आधारकार्ड अद्यावत
केंद्र जळगाव शहरात पुढील ठिकाणी
आधारकार्ड अद्यावत केंद्र जळगाव शहरात पुढीलप्रमाणे जळगाव प्रधान डाकघर, पांडे
डेअरी चौक, जळगाव, जळगाव बाझार उपडाकघर, पांडे डेअरी चौक, जळगाव, जळगाव कलेक्टोरेट
उपडाकघर, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव. एम.जे.कॉलेज उपडाकघर, साने गुरुजी
कॉलनी, भगीरथ शाळेजवळ जळगाव. तर चाळीसगाव
येथे चाळीसगाव प्रधान डाकघर, स्टेशन रोड, चाळीसगाव असे अधीक्षक डाकघर, जळगाव डाक
विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment