Wednesday, 11 October 2017

मुद्रांक विक्रेत्यांच्या संप कालावधीत कोषागार कार्यालयातून मुद्रांक मिळणार

            जळगाव, दि. 11 - मुद्रांक विक्रेत्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर जनतेची अडचण होवू नये यासाठी या संपाच्या कालावधीत नागरीकांना कोषागार कार्यालयातून मुद्रांक मिळणार असल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी श्री.प्र. सि. पंडित यांनी दिली आहे.
     नागरिकांना संप कालावधीत जळगाव कोषागार व उपकोषागार कार्यालयात शासकीय भरणा करुन शंभर व पाचशे रुपयांचे मुद्रांक बँकेच्या वेळेत उपलब्ध होतील. असेही जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.
                                                                             000

No comments:

Post a Comment