Thursday, 26 October 2017

कापूस, तूर, सोयाबीन वरील कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी करावयाची उपाययोजना



        जळगाव दि. 26- जळगाव, भुसावळ, बोदवड, यावल, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यात कापुस, सोयाबिन, तुर हे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.  शासनाने या पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरावर किड सर्वेक्षक व किड नियंत्रक यांची नेमणूक केली आहे. सद्यस्थितीत कापुस, सोयाबिन व तुर पिकावर किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.
            शेतकऱ्यांनी तूर पिकाचे शेंगा पोखरणा-या अळीच्या प्रादुर्भावासाठी निरीक्षण करावे. पुढील होणारा शेंगा पोखरणा-या अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 5% निबोंळी अर्काची फवारणी करावी. अळीने जाळे तयार केलेली पाने अळीसह काढून नष्ट करावी. अळीने जाळे तयार केलेले पाने अळीसकट काढून नष्ट करावी. पिक कळीधारण अवस्थेत असल्यास शेंगा पोखाणा-या अळीचा प्रादुर्भाव होउ शकतो. त्यासाठी निवारक उपाय म्हणून अझाडिरक्टिन 300 पि.पि. एम @ 50 मिली 10 लिटर पाण्यात फवारावे.
           कपाशीवर तुडतुडे आणि फुलकिडयाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास नियंत्रणासाठी फ्लोनिकामिड 50 डब्लू जि 4 ग्रम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकाचे नियमीत सर्वेक्षण करुन कीडीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी थायोडीकार्ब 75 डब्लू. पी. 20 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
०००००

No comments:

Post a Comment