जळगाव
दि. ३१ - पशुसंवर्धन विभागामार्फत
राज्यामध्ये मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेतंर्गत
“राजे
यशवंतराव होळकर महामेष योजना” नावाने नवीन योजना सुरु
करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत पायाभुत सोईसुविधांसह २० मेंढया आणि १ नर अशा
गटांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील भटक्या जमाती भज-क या प्रवर्गातील
लाभार्थ्यांनी १५ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा
पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
या
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा भटक्या जमाती – क या प्रवर्गातील असावा. लाभधारकाचे
वय १८ ते ६० असावे. ही योजना १ ते १५ नोव्हेंबर
२०१७ या कालावधीत सकाळी साडेदहा वाजेपासून
ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालू राहील.
अर्जदारांनी आपले अर्ज दिलेल्या कालावधी मध्ये ऑनलाईन www.http//.mahamesh.in या बेबसाईटवर भरुन सादर करावे. असे जिल्हा
पशुसंवर्धन उपआयुक्तजळगाव यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment