Sunday, 1 October 2017

फैजपूर येथील महाआरोग्य शिबीराची तयारी पूर्ण



         जळगाव, दि. 1 :- फैजपूर येथे 2 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील पहिले महाआरोग्य शिबीर होत आहे. या शिबीराचा आमदार हरिभाऊ जावळे, मुंबई येथील जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री तात्याराव लहाने, उपजिल्हाधिकारी (महसूल) अभिजीत भांडे पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी संयुक्तपणे आढावा घेवून परिसराची पाहणी केली.  
           यावेळी आमदार हरिभाऊ जावळे यांनी  परिसरातील ग्रामसेवक व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी आपल्या मुख्यालयात थांबून रुग्णांना शिबीरात पाठवावे अशा सुचना त्यांनी दिल्या.
           स्वच्छता दूत रामेश्वर नाईक यांनी  महाआरोग्य शिबीराची तयार पूर्ण झाली असून शिबीर यशस्वी करण्यासाठी संबंधीत यंत्रणा अहोरात्र काम करीत  असल्याचे यावेळी सांगितले. तसेच या  महाआरोग्य शिबीरात 3 हजार 700 डॉक्टर्स सेवा देणार आहेत. आतापर्यंत  77 हजार रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. जळगाव, बुलढाणा, धुळे येथून 2000 तर औरंगाबाद, पुणे,  मुंबई, नाशिक येथून 1 हजार 700 डॉक्टर्स येणार आहेत. शिबीरात  125 ओ.पी.डी.सेंटर्स, 2000 रुग्णांसाठी वाहने,  रुग्णांची दोन ठिकाणी नोंदणी,   औरंगाबादहून चार्टर्ड विमानाने 28 डॉक्टर तर जळगावहुन 14 डॉक्टर येणार आहेत. 06 ठिकाणी चौकशी कक्ष, पुरुषांसाठी 5 व महिलांसाठी 5 प्रसाधन गृह, अग्निशमनच्या चारही बाजूंनी चार गाड्या, 15 हजार स्वयंसेवक, नर्स, सरकारी स्टाफ, अधिकाऱ्यांचा मदतीसाठी ताफा असेल. या शिबीरात तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांची 6 तारखेपासून भुसावळ व परिसरात लगेच छोट्या शस्त्रक्रियेला सुरुवात होणार आहे तर मोठ्या शस्त्रक्रियेसाठी स्टिकर देण्यात येणार आहे. रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया मोफत होणार असून शस्त्रक्रियेनंतर प्रवास भाडे  मायलॉन कंपनीच्या वतीने केले जाणार. या शिबीरात टाटा, रिलायन्स, एमक्यूअर आदि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून गरजू रुग्णांना दत्तक घेणार आहेत.  दीड लाख रुग्णांच्या भोजन व्यवस्थेसाठी 100 क्विंटल तांदूळ,  4 ट्रक केळी, पाणी पाऊच, 15 हजार पाणी बाटल्या, 60 हजार बिस्कीट पुड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.  3 महिने अपॉइंटमेंट न मिळणारे असे 100 सुपर स्पेशालिटी डॉक्टरांचा या शिबिरात सहभाग होणार आहे. या शिबिरात एम.आर.आय., सिटी स्कॅन, एक्स रे, सोनोग्राफी, ई.सी.जी. तसेच रक्तासंदर्भातील सर्व चाचण्या  करण्यासाठी यंत्रसामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी 200 डॉक्टरांची टीम, स्वतंत्र. 26 ऍम्ब्युलन्स व्हॅन आहेत.  4 ठिकाणी पार्किंग व्यवस्था., 5 ठिकाणी प्रवेशद्वार, ऍलोपॅथी, 06 दंत चिकित्सा व्हॅन, 05 मोफत औषधींचे स्टॉल. स्त्रियांचे आजार, कर्करोग यासाठी विशेष व्यवस्था. अपंगांसाठी पार्किंग जवळच ओपीडी, स्ट्रेचरची सुविधा व 2 ठिकाणी औषधांची सुविधा उपलब्ध. या महाआरोग्य अभियानात अंदाजे 1 लाख 50 हजार रुग्णांची तपासणी होणार आहे. या शिबिरात आपल्या रुग्णाची नोंदणी करणे आवश्यक आहे. हे शिबीर 18 एकर जागेत होणार असून पार्कीसाठी ४ एकर जागा वापरण्यात येत आहे. शेवटच्या रुग्णाची तपासणी होईपर्यंत शिबीर सुरु राहणार असून रुग्णांनी शांततेत व रांगेत यावे. तसेच रुग्णांनी  व त्यांच्या नावाईकांनी शिबीरात स्वच्छता राखावी, ग्रामीण भागात होणारे महाआरोग्य शिबीर हे पहिले शिबीर आहे. चोपडा, पारोळा, अमळनेर, यावल, वरणगाव, भुसावळ, मुक्ताईनगर या परिसरातील नागरिकांनी  या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
           यावेळी डी.वाय.एस.पी. रायसिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवणे, मुंबईचे नोडल ऑफिसर डॉ. अशरथ खान, परिसरातील सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, वैद्यकीय अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment