जळगाव,
दि.12:- भारतीय डाक विभगामार्फत
बाल दिनाचे औचित्य साधून डाक तिकीट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डाक
अधिक्षक, जळगाव यांनी दिली आहे.
स्पर्धेचा
विषय घरटे (Nest) हा आहे.या स्पर्धेसाठी दोन विभाग करण्यात आले असून पहिल्या
विभागात इयत्ता पाचवी पर्यतचे विदयार्थी तर दुसऱ्या विभागात इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे
विदयार्थी सहभागी होवू शकतात.हे चित्र, पेटिंग ए-4 साईज कागदावर काढावयाचे आहे.
चित्र, पेटिंग हे आपल्या स्वत:च्या रचनेवर आधारित काढून (Own creativity) ते
शाळेच्या मुख्याध्यापकांकडून सत्यापित करुन घेणे आवश्यक आहे. काढलेले चित्र,
पेटिंग सहाय्यक महा निदेशक (फिलाटेली) खोलीनं.108, डाक भवन, नवी दिल्ली - 110001
या पत्यावर 20 ऑक्टोबर 2017 पर्यंत पोहोचेल अशा बेताने पाठवावे.
या
स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस दहा हजार रुपये, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस सहा
हजार रुपये, तृतीय क्रमांकाचे बक्षीस चार
हजार रुपये तसेच एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत. निवड
झालेले चित्र, पेंटिंग हे डाक तिकीट, फस्ट डे कवर, व इतर फिलाटेली मटेरीअल साठी
उपयोगात आणण्यात येईल.
जिल्हयातील
जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा.असे आवाहन अधीक्षक डाकघर,
जळगाव विभाग, जळगाव यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी डाक अधिक्षक कार्यालय, जळगाव
किंवा दूरध्वनी क्रमांक 0257-2229679/2224288 यावर संपर्क साधावा.
०००००
No comments:
Post a Comment