Tuesday, 10 October 2017

बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ



            जळगाव, दि. 10 - फेब्रुवारी-मार्च, 2018 मध्ये  घेण्यात  येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी)  परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव रा. र. मारवाडी यांनी दिली आहे.
            उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरण्यासाठी  विलंब शुल्कासह   18 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भरलेल्या (upload केलेल्या) आवेदनपत्रांची याद्यी दिलेल्या तारखांप्रमाणे व प्रचलित पध्दतीप्रमाणे बँक ऑफ इंडियामध्ये चलनाव्दारे शुल्क भरुन चलनाची प्रत विभागीय मंडळाकडे जमा करावी. आवेदनपत्रामध्ये शासन आदेशानुसार विद्यार्थ्याने त्याचा आधारकार्ड क्रमांक भरणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन प्री लिस्ट प्रिंट (On Line Pre-List Print) करुन घ्याव्यात. व  प्री लिस्ट (Pre-List) ची विद्यार्थ्यांमार्फत तपासणी करुन त्यांच्या ऑनलाईन दुरुस्त्या 31 ऑक्टोबर 2017 अखेर करणे आवश्यक असल्याचे सचिव,  राज्य मंडळ, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००

No comments:

Post a Comment