जळगाव दि. 3 सर्वोच्च
न्यायालयाने गठीत केलेल्या निवृत्त न्यायमुर्ती राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील
रस्ता सुरक्षा समितीने जिल्ह्यात सुचविलेले नशिराबाद, शिव कॉलनी आणि चाळीसगाव ‘ब्लॅक स्पॉट’ अपघात स्थळांवर तात्काळ
कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी आज
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत संबंधितांना दिले.
या
बैठकीस उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
संजय मस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, जिल्हा वाहतुक शाखा पोलिस
निरिक्षक अनिल देशमुख, शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरिक्षक सतिष भामरे, राष्ट्रीय
महामार्ग, राज्यपरिवहन विभाग, शहर महानगर पालिकेचे, नगर रचना विभागचे आदि अधिकारी
उपस्थित होते.
या
बैठकीत ईच्छादेवी चौक ते डी मार्ट या मार्गावर दुभाजक बसविणे, विद्युत डी.पी.स्थलांतर,
सिग्नल यंत्रणा टाईमर बसविणे, शहरात बस वाहतुक सुरु करणेबाबत शासनास प्रस्ताव सादर
करणेबाबत, सोलर एल.ई.डी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे धुळे येथील क्रेन
मागविणे, शहरातील 500 गतीरोधक पहाणी करुन त्यांची आवश्यकता व निकषांनुसार असल्याची
खात्री करणे, शालेय बस पार्किंग, अजिंठा चौफली वाहतुक नियमासाठी रस्ता दुभाजक
अतिक्रमण काढणे चौकात वर्तुळ करणे वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण आदी बाबीवर
चर्चा झाली.
समितीचे
सदस्य सचिव तथा उप प्रादेशिक अधिकारी श्री. जयंत पाटील यांनी उपस्थित सदस्यांचे
स्वागत करुन प्रास्ताविक केले.
00000
No comments:
Post a Comment