जळगाव, दि. 23 - विमुक्त जाती, भटक्या
जमाती, इतर मागासवर्ग अणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता व इतर अनुज्ञेय फीचा लाभ
मंजूरीसाठी लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजना (DBT) लागू करण्यात आली आहे.
त्यानुसार
विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागामार्फत मंजूर करण्यात येणा-या शिष्यवृत्ती,
शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता व इतर अनुज्ञेय फीचा लाभ
मिळण्यासाठीचे अर्ज सन 2017-18 पासून https://,mahadbt.gov.in हे संकेतस्थळ विकसीत करण्यात आले आहे. सर्व
पात्र लाभार्थ्यांनी त्यांचे अर्ज स्वत: भरुन या संकेतस्थळावर 31 ऑक्टोबर, 2017
पूर्वी अर्ज अपलोड करावेत. असे आवाहन खुशाल गायकवाड, सहायक आयुक्त, समाजकल्याण,
जळगाव यांनी केले आहे.
याबाबत
काही तांत्रिक अडचण किंवा शंका उद्भवल्यास DBT टोल फ्री क्रमांक 1800 1025 311
किंवा ईमेल - mahadbt.helpdesk@maharashtra.gov.in वर संपर्क साधावा. असेही सहायक आयुक्त यांनी
कळविले आहे. 00000
No comments:
Post a Comment