Wednesday, 4 October 2017

6 ऑक्टोबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन



         जळगाव दि. 4- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने दि 6 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता मेस हॉल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
    या रोजगार मेळाव्यात जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील एकूण 9 उद्योजकांची उपस्थिती राहणार असून त्यांच्यामार्फत एकूण 683 पदे अधिसूचीत करण्यात आलेली आहेत. तसेच शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळांचे प्रतिनिधी आणि जिल्हयातील व्यवसाय प्रशिक्षण संस्था उपस्थित राहणार आहेत. या रोजगार मेळाव्याचा बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक संचालक श्रीमती अनिसा तडवी कौशल्य विकास़, रोजगार व उद्योजकता जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले आहे.
०००००

No comments:

Post a Comment