Monday, 23 October 2017

नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध



      जळगाव, दि.23 - जवाहर नवोदय विद्यालय साकेगाव येथे सहावीच्या वर्गात प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा 2018 चे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरले जात आहेत. अर्ज भरताना काही पालकांना तांत्रिक अडचण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन नवोदय विद्यालय समितीने ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुध्दा उपलब्ध करुन दिली आहे.
            ऑफलाईन अर्ज www.jnvjalgaon.com या वेब साईटवर उपलब्ध आहे. हा अर्ज पालकांनी डाउनलोड करुन घ्यावा.  अर्ज भरुन त्यावर मुख्याध्यापकांचची स्वाक्षरी घेवून तो अर्ज प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, भुसावळ येथे जमा करावे. ज्यांनी यापूर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहे. त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर, 2017 असून अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक - 02582/222132 वर संपर्क  साधण्याचे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य श्री. वी. नारायणराव यांनी केले आहे.  
०००००

No comments:

Post a Comment