जळगाव, दि.23 - जळगाव जिल्हा होमगार्ड संघटनेत रिक्त असलेली पुरुष व
महिला स्वयंसेवकांची 615 पदांच्या अंतिम निवड सुचीस महासमादेशक, होमगार्ड यांनी मान्यता
दिल्याची माहिती जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी
दिली आहे.
जिल्हा
होमगार्ड संघटनेत अनुशेष असलेली 615 पदे भरणेकामी स्वयंसेवकांचा नोंदणी कार्यक्रम
जुलै महिन्यात आयोजित करण्यात आला होता. ही अंतिम निवड सूची www.jalgaon.nic व www.jalgaonpolice.gov.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीसाठी
प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच ही यादी प्रत्येक तालुका पथक, उपपथक याठिकाणीही प्रसिध्द
करण्यात आली आहे.
उमेदवारांनी
या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच अंतिम निवड झालेल्या उमेदवारांनी आपले तालुका पथक,
उपपथकाचे ठिकाणी संपर्क साधावा. असे आवाहन बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक तथा जिल्हा
समादेशक होमगार्ड, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment