जळगाव, दि. 29 - समाजकल्याण
विभागातर्फे मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती
यंत्रणेने नागरीकांपर्यंत पोहचवावी. तसेच योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी
अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करण्याच्या सूचना सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप
कांबळे यांनी दिले. समाज कल्याण
विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक राज्यमंत्री श्री.
कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज अजिंठा
शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. या बैठकीला आमदार सुरेश भोळे, उपजिल्हाधिकारी
राहुल मुंडके, सहाय्यक आयुक्त खुशाल गायकवाड, समाज कल्याण अधिकारी (जि.प.) अनिता
राठोड, योगेश पाटील, प्रभारी विशेष अधिकारी आर. डी. पवार व महामंडळाचे सर्व जिल्हा
व्यवस्थापक उपस्थित होते.
या बैठकीत बोलतांना राज्यमंत्री कांबळे
म्हणाले की, समाज कल्याण विभागातर्फे मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना
ह्या त्यांचे जीवनमान उंचावविण्यासाठी असतात. जेणेकरुन ते या योजनांच्या आधारे
समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील व त्यांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. यासाठी
शासनाकडून मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या निधीचा विनियोग
खऱ्या लाभार्थ्यांना झाला पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याच्या सूचनाही
श्री. कांबळे यांनी यावेळी उपस्थितांना दिल्यात.
यावेळी राज्यमंत्री श्री. कांबळे यांनी
अल्पसंख्याक विभागासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचाही आढावा
घेतला.
00000
No comments:
Post a Comment