जळगाव, दि.31- राज्याचे सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक
उपक्रम राज्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा
बुधवार 1 नोव्हेंबर रोजीचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
बुधवार 1 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी
10.00 वाजता ठाणे निवासस्थान येथून मोटारीने पाचोरा जि. जळगावकडे प्रयाण. सायं 4
वा. पाचोरा जि. जळगाव शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वा. 30 मि.नी
ते सायं 6.00 वाजेपर्यंत मा. आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या
वाढदिवसानिमीत्त सदिच्छा भेट व त्यांच्या मतदार संघातील विविध विकास कामांचा
शुभारंभ व उदघाटन कार्यक्रम. स्थळ :- पाचोरा विधानसभा मतदार संघ. सायं 6.00 वा.
पाचोरा येथून मोटारीने ठाणेकडे प्रयाण.
०००००
No comments:
Post a Comment