जळगाव-दि.9:-
जिल्हयातील सर्व शाळांमधील प्रत्येक विद्यार्थी खेळात सहभागी होईल असे सुक्ष्म
नियोजन करा अशा सूचना जिल्हाधिकारी श्री.किशोर राजे निंबाळकर यांनी आज दिल्या.
त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा क्रीडा
कार्यालयाच्या वतीने आयोजित “चला खेळू
या” या नाशिक विभाग स्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत
बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या सूचना
केल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) श्री. अभिजीत भांडे पाटील, क्रीडाधिकारी
सुनंदा पाटील, शिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. निंबाळकर पुढे म्हणाले की, आजचा
विद्यार्थी खेळापासून दूर जात आहे. संगणक, व्हिडिओ गेम आणि मोबाईलमध्ये जास्त
गुंतत चालला असून हे फार धोकादायक आहे. नर्सरी ते आठवी पर्यत प्रत्येक शाळेतील
प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थीनी किमान एका तरी खेळात सहभागी कसा होईल असे नियोजन
क्रीडाधिकाऱ्यांनी करावे.
खेळाडू हा शाळास्तरावरुन केंद्र स्तरावर, केंद्रस्तरावरुन तालुका स्तरावर,
तालुकास्तरावरुन जिल्हास्तरावर खेळेल जिल्हास्तरावरील विजयी खेळाडू विभाग स्तरावर
जाईल. नाशिक विभागात आपला जिल्हा अग्रभागी कसा राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न
करावे. जिल्हयातील स्वयंसेवी संस्था, क्रीडा संस्थाचा यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवा
असे सांगून त्यांनी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यासाठी समन्वयक म्हणून काम
करतील.
जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील
यांनी बैठकीत माहिती देतांना सांगितले खेळाची संस्कृति रुजावी, प्रत्येक विदयार्थ्याने
मैदानी खेळ खेळावा, यासाठी नोव्हेंबर महिना नाशिक विभागात “खेळ महिना’’ म्हणून (Sport Month) साजरा करण्यात
येत आहे. जिल्हयात तालुका समन्वयक नेमण्यात आलेले असून 700 शाळांची आयोजन संदर्भात
कार्यशाळा संपन्न झाली आहे.
00000
No comments:
Post a Comment