जळगाव, दि. 10 - भारताचे माजी राष्ट्रपती
दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत
पाटील यांनी दिली आहे.
वाचनप्रेरणा दिनानिमित्ताने ज्ञानसंपन्न
आणि माहिती समृध्द समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास
होण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे
आयोजन करण्यात येणार आहे.
०००००
No comments:
Post a Comment