जळगाव,दि.16 :- येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच 19- डीबी-0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी 25 व 26 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज करावेत. असे आवाहन जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.
पसंती क्रमांकांच्या अर्जासोबत शासकीय शुल्काचा डीडी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे, ओळखपत्रासह सादर करावा. दि. 26 ऑक्टोबर 2017 रोजी अर्जाची छानणी करण्यात येईल. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत वाढीव शुल्काच्या (डीडी) धनादेश बंद लिफाफ्यातुन 27 ऑक्टोबरपर्यंत दुपारी 4.00 वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक राहील. त्याचदिवशी दुपारी साडेचार वाजेपर्यत बंद लिफाफे उघडण्यात येतील व उर्वरित धनादेश परत करण्यात येतील. असे श्री. पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.
00000

No comments:
Post a Comment