जळगाव, दि. 30
- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही
दिन सोमवार 6 नोव्हेंबर, 2017 रोजी दुपारी तीन
वाजता जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी
दिली आहे.
जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर दर
महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सोमवार 6 नोव्हेंबर रोजी लोकशाही दिनाचे
आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनी
नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात आणाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment