जळगाव, दि. २५ - कोषागारातून निवृत्तीवेतन, कुटूंब
निवृत्तीवेतन घेणा-या राज्य शासनाचे व इतर निवृत्तीवेतन धारक, कुटूंब
निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतन विषयक अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी ३१
ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारी चार वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
येथे मेळावा आयोजित केला आहे. अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी प्र. सि. पंडीत
यांनी दिली आहे.
निवृत्ती
वेतनधारकांनी त्यांच्या समस्या सोडविणे तसेच जिवन प्रमाण पोर्टलवर Digital Life
Certificate सादर करणेसाठी आवश्यक ती
माहिती सादर करण्यासाठी या तिमाही मेळाव्यात मार्गदर्शन करुन त्यांच्या समस्यांचे
निराकरण करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त निवृत्ती वेतनधारकांनी या मेळाव्यास
उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment