जळगाव-दि.10- शासकीय हमी भावाने उडीद, मूग खरेदीसाठी ऑनलाईन पध्दतीने शेतकरी
नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटींग
अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यात
नाफेड अंतर्गत् उडीद व मुगाची खरेदी जळगाव
तालुका शेतकरी सहकारी संघ, जळगाव, अमळनेर तालुका शेतकरी सहाकरी संघ, अमळनेर व
पाचोरा तालुका शेतकरी सहकारी संघ, पाचोरा या ठिकाणी सुरु करण्यात आलेली आहे.
शेतकरी बांधवांनी FAQ प्रतीचा उडीद व मूग विक्री करण्यासाठी याठिकाणी संपर्क
साधावा.
ऑनलाईन
नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या नावाचा 7/12 चा पिकपेरा लावलेला उतारा,
बँकेच्या पासबुकची झेरॉक्स (ऑनलाईन खाते असलेला) व आधारकार्ड आणि मोबाईल नंबर इत्यादी
माहिती घेऊन नोंदणी करावी. उडीद व मूगाचे खरेदीस मंजुरी आल्यानंतर शेतकऱ्यांना आपला
उडीद, मूग खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणण्याबाबत कळविण्यात येणार असल्याचे जिल्हा
मार्केटिंग अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment