जळगाव-दि.9-
बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियाना अंतर्गत जिल्हयात बालिका सप्ताहाचे
आयोजन करण्यात आले आहे. दि. 9 ऑक्टोबर 2017 रोजी सदर बालिका सप्ताहाचे उदघाटन मा.
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या
हस्ते करण्यात आले. यावेळी सदस्य सचिव जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, न्या. ठोंबरे, जळगाव
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा महिला व बाल
विकास अधिकारी, श्री. तडवी. जळगाव जिल्हयातील नागरी भागातील अंगणवाडी सेविका,
जळगाव ग्रामीण विभागातील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, महिला महाविद्यालयातील
शिक्षिका व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांनी बेटी
बचाओ बेटी पढाओ अभियांनाच्या यशस्वितेची शपथ घेतली. त्यानंतर आयोजित रॅलीस मा.
जिल्हाधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. सदर रॅलीस
जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात होवून आकाशवाणी चौक, भास्कर मार्केट मार्गे, स्वातंत्र्य चौकातून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात येवून विनोद ढगे यांच्या
कलापथने पथनाटयाचे सादरीकरण केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर
यांनी उपस्थितांचे आभार मानले.
जिल्ह्यात
बालिका सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये रॅली,
पथनाटय् महाविद्यालयस्तरावर घोषवाक्य स्पर्धा PC PNDT कायद्याबाबत जागृती करणे, बेटी बचाओ बेटी पढाओ
योजनेच्या प्रचार, प्रसिध्दीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
तसेच दिनांक 1 मे 2017 ते 31 सप्टेंबर 2017 या कालावधीत एका मुलीवर कुटुंब नियोजन
शस्त्रक्रीया केलेल्या जोडप्यांचा सत्कार
करण्यात येणार आहे. या बालिका सप्ताहात जळगाव जिल्हयातील सर्व नागरीकांनी सहभागी
व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment