जळगाव, दि. 23 - जळगाव बाजार समिती आवारात नाफेडमार्फत कार्यरत
असलेले उडीद, मूग, सोयाबीन खरेदी केंद्रास सहकार व पणन विभागाचे मंत्रालय, मुंबई
येथील अधिकारी विद्याधर महाले यांनी भेट देऊन तपासणी केली. तसेच केंद्रावरील
उपस्थित शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
किमान आधारभूत धान्य खरेदी योजनेचा लाभ
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी
बांधवानी घ्यावा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांच्यासोबत जळगाव
येथील सहकार विभागाचे अधिकारी, जिल्हा
मार्केटींग अधिकारी, बाजार समितीचे सचिव व जळगाव तालुका शेतकरी संघाचे कर्मचारी,
नाफेडचे ग्रेडर आदि उपस्थित होते. असे मार्केटींग अधिकारी, जळगाव यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment