जळगाव,
दिनांक 15 - ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय
अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त विद्ममाने 17 व 18 नोव्हेंबर, 2017 रोजी सरस्वती हॉल,
लेवा बोर्डींग परिसर, जळगाव येथे ग्रंथोत्सव-2017 चे आयोजन करण्यात आले आहे. अशी
माहिती जिल्हा ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर
यांनी दिली आहे.
दोन
दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक
बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते
दिनांक 17 नोव्हेंबर, 2017 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जलसंपदामंत्री ना.
गिरीष महाजन हे भूषविणार आहे. तर विशेष अतिथी म्हणून सहकार राज्यमंत्री ना.
गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून महापौर
ललित कोल्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वला पाटील, खासदार ए. टी.
नाना पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार
सर्वश्री. डॉ. सुधीर तांबे, डॉ. अपूर्व
हिरे, चंदुलाल पटेल, एकनाथराव खडसे, डॉ. सतीष पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे,
चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, शिरीषदादा चौधरी, सुरेश भोळे, किशोर पाटील,
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सहायक ग्रंथालय संचालक, नाशिक आशिष ढोक आदि
मान्यवर उपस्थित राहणार आहे.
ग्रंथोत्सवाच्या
पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात शुक्रवार 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता
बहिणाबाई उद्यान ते सरस्वती हॉलपर्यंत ग्रंथदिडी काढण्यात येणार आहे. ग्रंथदिंडीचे
पूजन आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते होणार असून महापौर ललित कोल्हे, ग्रंथोत्सव
समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे हे यावेळी
प्रमुख्याने उपस्थित राहणार आहे.
दुसऱ्या
सत्रात दुपारी 3 वाजता ‘ग्रंथ हेच गुरु’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाच्या
अध्यक्षस्थानी तानसेन जगताप हे राहणार असून किसन पाटील, मिलींद बागुल, मिलींद
कुलकर्णी, प्रभाकर चव्हाण हे सहभागी होणार आहे. दुपारी 4.30 वाजता काव्यसंमेलनाचे
आयोजन करण्यात आले असून या संमेलनाच्या अध्यक्षस्थान कवीवर्य ना.धो.महानोर हे
भूषविणार आहे. या संमेलनात कवी अशोक सोनवणे, अशोक कोतवाल, रमेश पवार, आबा महाजन,
शशिकांत हिंगोणेकर, श्रीमती माया धुप्पड, सत्यजीत साळवे हे सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या
दिवसाच्या पहिल्या सत्रात शनिवार 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ‘स्पर्धा
परिक्षा एक आव्हान’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात प्रा. जयेंद्र
लेकुरवाळे, यजुर्वेद महाजन हे सहभागी होणार आहेत.
तर
दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात दुपारी 2 वाजता ‘डिजीटल युगात ग्रंथांचे महत्व’
या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान डॉ.
अनिल चिकाटे हे भूषविणार असून शेखर पाटील,
चंद्रकांत भंडारी हे यात सहभागी होणार आहे.
या
ग्रंथोत्सावानिमित्ताने याठिकाणी ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि साहित्यिक
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथ प्रदर्शन 17 व 18 नोव्हेंबर, 2017 असे
दोन दिवस सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले राहणार असून प्रवेश सर्वांना
विनामुल्य राहणार आहे.
या
ग्रंथोत्सावास जिल्हयातील विद्यार्थी, वाचक, साहित्यिक व नागरीकांनी मोठया
संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी
किशोर राजे निंबाळकर, समितीचे सदस्य शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन,
जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा प्रकाशक संघटनेचे प्रतिनिधी युवराज
माळी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी तानसेन जगताप, जिल्हा
ग्रंथालय संघाचे कार्यवाह अनिल अत्रे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सदस्य सचिव
प्रशांत पाटील यांनी केले आहे.
0 0 0 0
No comments:
Post a Comment