जळगाव,
दि. 13 एचआयव्ही बाधित व्यक्तींचे आधारकार्ड
काढण्यासाठी त्यांना एका ठराविक दिवशी तहसील कार्यालयात बोलवून त्यांचे आधारकार्ड
काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी
(महसूल) अभिजित भांडे पाटील यांनी दिली.
महिला
जिल्हा सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. भांडे पाटील
यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश
काटकर, समितीचे शासकीय सदस्य जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा सरकारी
वकिल ॲड कुंदन ढाके, सहायक आयुक्त, समाजकल्याण खुशाल गायकवाड, एडस् कंट्रोल
सोसायटीचे डॉ. पहूरकर, जिल्हा परिषदेचे बालविकास अधिकारी श्री. तडवी, पोलीस
निरिक्षक सुनिल कुऱ्हाडे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी तसेच अशासकीय सदस्य
उपस्थित होते.
एडस्ा ग्रस्त कुटूंबांना पिवळया रेशनकार्डवर प्राधानान्ये धान्य उपलब्ध करुन देता यावे
यासाठी त्यांचेकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. यासाठी एडस कंट्रोल सोसायटीने अशा
व्यक्तींची यादी उपलब्ध करुन दिल्यास त्यांना एका ठराविक दिवशी संबंधित तहसील
कार्यालयात बोलावून त्यांचे आधारकार्ड तातडीने काढण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही
महसूल विभागामार्फत करण्यात येईल. तसेच त्यांचे मतदानकार्ड, रेशनकार्ड व आधारकार्ड
काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. एचआयव्ही बाधितांच्या
संपूर्ण निराधार असलेल्या मुलांना बाल संगोपन योजनेतंर्गत लाभ देण्याच्या बाबी
तसेच कौटूंबिक हिंसाचार संरक्षणासंदर्भात दाखल प्रकरणे आदिंवर या बैठकीत चर्चा
करण्यात आली. यावेळी अशासकीय सदस्यांनी
काही महत्वपूर्ण सुचना केल्या या सुचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही श्री.
भांडे पाटील यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
00000
No comments:
Post a Comment