Saturday, 18 November 2017

औरंगाबाद येथे डाक अदालतीचे आयोजन 8 डिसेंबरपर्यंत तक्रारी पाठविण्याचे आवाहन



        जळगाव, दिनांक, 18 - पोस्टाच्या सेवेबद्दलच्या तक्रारींचा योग्यप्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट मास्तर जनरल, औरंगाबाद येथे 22 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी 3.00 वाजता त्यांच्या कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
            औरंगाबाद क्षेत्र संबंधीत टपाल सेवेविषयी किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषत: टपाल वस्तु,  मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणापत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहे. तरी संबंधीतांनी डाक सेवे बाबतची आपली तक्रार श्री. एस. एस. परळीकर, सहाय्यक निर्देशक, डाक सेवा, पोस्ट मास्तर जनरल यांचे कार्यालय, औरंगाबाद 431002 यांचे नांवे दोन प्रतीत 8 डिसेंबर, 2017 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशारीतीने पाठवावी. असे आवाहन पोस्ट मास्टर जनरल, औरंगाबाद क्षेत्र, औरंगाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

0 0 0 0 0

No comments:

Post a Comment