जळगाव,
दि. 30 - जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्तोन जिल्ह्यात 1 ते 15 डिसेंबर पर्यंत
जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक, सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्यावतीने
विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे
अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार
परिषदेत दिली. यावेळी त्यांचेसमवेत पथकाचे प्रमूख डॉ. संजय पहूरकर, डॉ. योगिता
बावीस्कर आदि उपस्थित होते.
कौटुंबिक तपासणी - महाराष्ट्र राज्य एड्स नियत्रंण संस्थेमार्फत् राज्यभर
जागतिक एड्स नियंत्रण सप्ताहास साजरा करीत आहे. या मोहिमेमध्ये एचआयव्ही संसर्गित
आढळलेल्या प्रत्येक रुग्णाला एआरटी सुरु करणे, एचआयव्ही संसर्गित आढळलेल्या
प्रत्येक रुग्णाच्या कुटूंबातील सर्व व्यक्तींची एचआयव्ही तपासणी करणे, अतिजोखिम
गटामध्ये असलेल्या लोकांची एचआयव्ही तपासणी करण्यात येणार आहे. एचआयव्ही संसर्गित
व्यक्तीबद्दल समाजामध्ये असणारी भेदभावाची भावना बदलून त्यांना समानतेची वागणुक
देणे. एचआयव्ही संसर्गित व्यक्तींना औपधोपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी या मोहिमेत
विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.
एचआयव्हीसह जगणा-या व्यक्तींकरिता विविध स्पर्धा
- 10 ते 18 नोव्हेंबर 2017 दरम्यान
एचआयव्ही संसर्गित व्यक्तीकरिता, चित्रकला व घोषवाक्य स्पर्धा, आत्मलेख इत्यादी
स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये एकूण 30 व्यक्तींनी सहभाग नोंदवुन
त्यामधून चित्रकला व घोषवाक्य स्पर्धेतील उत्कृष्ठ विजेते निवडणे.
एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींकरिता वधुवर
परिचय मेळावा - सुरत येथे एचआयव्हीसह जीवन
जगणा-या रुग्णांसाठी 1 डिसेंबर 2017 रोजी राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे
आयोजन करण्यात आलेले आहे. याकरिता 11 ते 25 नोव्हेंबर 2017 दरम्यान वधुवर परिचय
मेळाव्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. या मेळाव्यास जळगाव जिल्हयातून 7
विवाह इच्छुकांनी अर्ज सादर केलेले आहेत.
पोस्टर प्रदर्शन, पथनाट्य, प्रभातफेरी - जिल्हा
एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभागातर्फे एचआयव्ही, एड्स व जागतिक एड्स नियंत्रण
दिनाविषयी पोस्टर प्रदर्शन, प्रभातफेरी व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचे
उद्घाटन 1 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 8.30 वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात
येणार आहे. या प्रभात फेरीमध्ये माध्यमिक शाळातील, महाविद्यालयातील विद्यार्थी,
आरोग्य विभाग, शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्था
सहभागी होणार आहे. ही प्रभातफेरीचा सामान्य रुग्णालय जळगाव येथून निघुन बेंडाळे
चौक - चित्रा चौक - शिवाजी चौक - नविन बस स्टॅन्ड - स्वातंत्र चौक मार्ग सामान्य
रुग्णालय असा मार्ग आहे. तालुकास्तरावर चोपडा, अमळनेर, जामनेर, धरणगाव, पाचोरा
येथील ग्रामीण रुग्णालयातील आयसीटीसी केंद्रामार्फत प्रभातफेरी व पोस्टर
प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच 2 व 3 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा एड्स
नियंत्रण व प्रतिबंधक विभाग, सामान्य रुग्णालय, जळगाव यांचेवतीने जळगाव नवीन
बसस्थानक व रेल्वे स्थानक, जळगाव च्या आवारामध्ये पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात
येणार आहे. यामध्ये एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तर 2 डिसेंबर
2017 रोजी अमळनेर येथे दुपारी 3 वाजता विप्रो कंपनीमध्ये एचआयव्ही, एड्सबाबत
जनजागृती पर लघुपट व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच
देहविक्री करणा-या महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स
नियंत्रण संस्थेमार्फत अनुदानित अशासकीय संस्थेच्या माध्यमातून विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
भगिणी मेळावा - 9 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी 4 वाजता संगीत सभागृह, भास्कर
मार्केट, जळगाव येथे पोस्टर प्रदर्शन, व्याख्याने, लघुपट या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे. तर 12 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा उद्योग केंद्र, भुसावळ येथे
दुपारी 2 वाजता गोदावरी संस्था, जळगाव यांचेतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार
आहे. तसेच आधार संस्था, अमळनेरतर्फे 1 ते 15 डिसेंबर 2017 दरम्यान अमळनेर, पाचोरा,
चोपडा तालुक्यातील भगिनींकरिता भगिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
रेड रिबिन क्लब - 1 डिसेंबर, 2017 जागतिक एड्स नियंत्रण दिन व सप्ताहाच्या
निमित्ताने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत असलेल्या सर्व एनएसएस युनिट व रेड
रिबिन क्लब तर्फे महाविद्यालयामध्ये 5 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत हिवाळी
शिबीरांमध्ये प्रत्येक गावामध्ये एचआयव्ही, एड्स जनजागृतीवर कार्यक्रम आयोजित
करण्यात येणार आहे.
शासकीय योजनांच्या माहितीचा मेळावा - एचआयव्हीसह जीवन जगणा-या लोकांकरिता जागतिक एड्स दिन व सप्ताहाच्या
निमित्ताने 21 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी 2 वाजता शासनाच्या विविध योजनांची माहिती
देण्याबाबतचा कार्यक्रम एआरटी केंद्र, सामान्य रुग्णालय, जळगाव येथे आयोजित
करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व आयसीटीसी केंद्राव्दारे अतिजोखिम
गटातील व्यक्तींकरीता तसेच महाविद्यालयीन युवक, युवतीकरिता एचआयव्ही, एड्स विषयक
जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संजय पहूरकर
यांनी यावेळी दिली.
ट्रक चालक व वाहक तसेच निगडीत कर्मचारी यांचा
मेळावा - 1 ते 15 डिसेंबर दरम्यान
ट्रान्सपोर्टनगर व शहराच्या आत येणाऱ्या नाक्यांवर पोस्टर प्रदर्शन, माहितीपत्रके
वाटप करणे व व्याख्याने देऊन परिवहन विभागाच्या सहकार्याने ट्रक चालक व वाहक
यांचेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
एचआयव्ही
संसर्गित व्यक्तींनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 0 0
No comments:
Post a Comment