Friday, 17 November 2017

लिव्ह ॲण्ड लायसन्स करारनामा दस्तऐवज नोंदणी करुन घेण्याचे आवाहन



          जळगाव दि. 17 :- नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत लिव्ह ॲण्‍ड लायसन्‍स करारनामा दस्तऐवज ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची सुविधा शासनाने नागरिकांकरिता उपलब्ध करुन दिली आहे. नागरीकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर. एल. पाटील, सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
            भाडेपट्टा नियंत्रण कायदा कलम 55 अन्वये सर्व करारनामे नोंदणीकृत करणे हे मिळकतधारकांच्या लाभाचे आहे.  त्यामुळे अशा करारनाम्यास कायदेशीर संरक्षण प्राप्त करुन घ्यावे. तसेच दस्तऐवजाची कायदेशीर वैधता प्राप्त करुन घ्यावी. तसेच जे करारनामे नोंदणी करावयाचे राहून गेले असतील असे करारनामे मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांचेकडे जमा केल्यास त्यावर आवश्यक ते मुद्रांक शुल्क आकारून असे दस्तऐवज प्रमाणित करुन देण्यात येतील असेही सह जिल्हा निबंधक श्री. पाटील यांनी कळविले आहे.
000000

No comments:

Post a Comment