Monday, 13 November 2017

पंडीत नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आदराजंली


         जळगाव, दि. 14 - भारताचे माजी पंतप्रधान स्व. पंडीत नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी स्व. पंडीत नेहरुंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
         यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील उप जिल्हा निवडणूक अधिकारी मनोहर चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, चिटणीस मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार पंकज लोखंडे, विकास लाडवंजारी यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                                                                     000

No comments:

Post a Comment