जळगाव, दि.
21 - मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र
राज्य, मुंबई यांचे निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यातील अकार्यरत धर्मादाय संस्थांची यादी
तयार करण्यात आलेली आहे. ही यादी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव येथील
नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या अकार्यरत संस्थांच्या यादीतील
विश्वस्तांनी यादी प्रसिध्द झाल्यापासून तीस
दिवसाचे आत त्यांच्या संस्थेचे प्रलंबीत हिशोबपत्रके व फेरफार अर्ज दाखल
करावेत. असे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव यांनी केले
आहे.
ही यादी मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
कार्यालयाच्या www.charity.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
अकार्यरत संस्थेच्या यादीमध्ये ज्या संस्थांनी संस्था नोंदणी झाल्यानंतर किंवा
मागील पाच वर्षापासुन आजपावेतो त्यांची वार्षीक हिशोबपत्रके किंवा विश्वस्तांमधील
बदल घटनेच्या तरतुदीनुसार त्या संस्थेच्या मालमत्ते बाबतीत व इतर झालेल्या
बदलाबद्दल फेरफार अर्ज दाखल केलेले नाहीत. अशा संस्थांचा अकार्यरत संस्था म्हणून
समावेश करण्यात आलेला आहे.
या अभियानाचा मुळ उद्देश हा अकार्यरत
संस्थांना प्रवाहात आणुन पुन्हा कार्यरत करणे हा आहे. तथापि ही यादी प्रसिध्द
झाल्यापासून तीस दिवसाचे आत अकार्यरत
संस्थांच्या विश्वस्तांनी त्यांच्या संस्थेचे प्रलंबीत हिशोबपत्रके व फेरफार अर्ज
दाखल केले नाही. तर त्यांच्या संस्थेची नोंदणी मा. धर्मादाय उप आयुक्त, जळगाव
यांचेमार्फत महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 22 (3) अ
अंतर्गत स्वयंखुद्द चौकशी करुन रद्द करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक न्यास नोंदणी
कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment