Wednesday, 15 November 2017

जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव व डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त बेंडाळे महाविद्यालयात ‘माध्यमांसमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन



       जळगाव, दि. 15 - राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव व डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ‘माध्यमांसमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी दिली.
            या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राणे हे राहणार आहेत. या चर्चासत्रात वृत्तपत्रांसमोरील आव्हाने (प्रिंट मिडीया) या विषयावर लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, देशदूतचे संपादक हेमंत अलोने, दिव्य मराठीचे निवासी संपादक त्र्यंबक कापडे, सकाळचे संपादक विजय बुवा, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया समोरील आव्हाने या विषयावर झी 24 तासचे प्रतिनिधी विकास भदाणे, मी मराठी चे प्रतिनिधी संतोष सोनवणे तर सोशल मिडीयासमोर आव्हाने या विषयावर दैनिक जनशक्तीचे प्रतिनिधी श्री. शेखर पाटील व जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी हे मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्रास जिल्ह्यातील सर्व दैनिकांचे मान्यवर संपादक, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.
            या चर्चासत्रास प्रसार माध्यमातील प्रतिनिधी, मास मिडीया व वृत्तपत्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके व बेंडाळे महाविद्यालयाच्या मास मिडीया विभागाचे प्रमुख प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले आहे.
०००००

No comments:

Post a Comment