जळगाव, दि. २०- दर महिन्याच्या
तिसऱ्या सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात
उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत भांडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, पोलिस, जिल्हा उपनिबंधक सहकारी
संस्था,संरक्षण अधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित
होते.
या बैठकीत लोकशाही
दिनातील प्रलंबीत अर्ज व निकाली अर्जाचा आढावा घेण्यात आला. संबंधीत विभागांनी
महिला लोकशाही दिनातील तक्रार अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना श्री.
भांडे पाटील यांनी दिल्या. आजच्या लोकशाही दिनात सहकार विभागाशी संबंधित एक अर्ज
प्राप्त झाला. हा अर्ज पुढील कार्यवाही विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती श्री.
काटकर यांनी दिली.
००००००
No comments:
Post a Comment